HM Message

SV Primary School Vidyapeeth    30-Sep-2025
Total Views |
 
HM
 
नमस्कार, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेत आपले हार्दिक स्वागत. 14 जून 1972 साली आपल्या शाळेची स्थापना पुणे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात झाली. आपल्या संस्थेचा व शाळेचा गौरवशाली इतिहास आहे. विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आपली शाळा सुरू झाली. आपल्या शाळेचे ध्येय विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कृती, प्रामाणिकपणा, प्रेम,सत्यता, शब्द आणि कृती यांच्याशी बांधिलकी यासह मूल्य रुजवणे आहे. याचबरोबर ज्ञान मिळवून बलोपासने सोबतच सेवेचे व्रत अंगीकारणे हे आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यासाठी विविध खेळ घेतले जातात. खेळासाठी प्रशस्त मैदान आहे. संस्कारक्षम उपक्रमात सांस्कृतिक संवर्धनासाठी सण- समारंभ साजरे केले जातात. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम रहावे, या दृष्टीने विविध क्रीडा प्रकार व योगाभ्यास शिकवले जातात. अद्ययावत संगणक प्रणाली व स्मार्ट बोर्ड इ. बाबी विद्यार्थी सहजरीत्या हाताळतात. ग्रंथालयात अनेक प्रकारचे साहित्य ग्रंथ उपलब्ध असून त्याचे वाचन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. अभ्यासिकेबरोबरच विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींचा परिचय होण्यासाठी विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती बाग तयार केली असून विद्यार्थ्यांना जवळून वनौषधींचा परिचय होतो. त्यातून त्यांना उत्तम माहिती मिळते. शालाबाह्य स्पर्धा व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी उत्तुंग यश प्राप्त करतात. विद्यार्थ्यांची काळजी घेणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळेतील कर्मचारी तसेच पालक यांच्या सहकार्याने काम करण्यास मला खूप आनंद होतो. विशेष बाब म्हणजे 55 वर्षांपासून आपली शाळा कार्यरत आहे. माजी विद्यार्थी विविध स्तरांवर मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, याचा मला अभिमान आहे. ते सदैव शाळेशी जोडले गेले आहेत. शाळेमध्ये आयोजित केलेला सर्व अभ्यासक्रम व अभ्यासेतर इतर उपक्रमांमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया...